31 C
Mumbai
Monday, January 13, 2025
घरराजकारणबाबर, बांगलादेश आणि संभलमधील समाजकंटकांचा डीएनए एकच!

बाबर, बांगलादेश आणि संभलमधील समाजकंटकांचा डीएनए एकच!

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ४३ व्या रामायण मेळ्याच्या उद्घाटनासाठी अयोध्येत आलेले असताना त्यांनी देशाचे वातावरण बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर निशाणा साधला. योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी लोक आणि समाज एकत्र केला होता. त्यांच्या जोडण्याच्या या कामाला जर आपण महत्त्व दिले असते, समाजाच्या शत्रूंचे डावपेच यशस्वी होऊ दिले नसते तर हा देश कधीच कोणाचा गुलाम झाला नसता. आपली तीर्थक्षेत्रे अपवित्र झाली नसती. आपल्या परस्पर ऐक्यामध्ये अडथळे निर्माण करणारे लोक यशस्वी झाले आणि त्यांचे वंशज आजही जातीच्या नावावर राजकारण करून समाजाची बांधणी विसकटवण्याचे काम करत आहेत.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, ५०० वर्षांपूर्वी बाबरच्या सेनापतीने अयोध्येत काय केले ते लक्षात ठेवा. संभलमध्येही तेच घडले, बांगलादेशातही तेच घडत आहे. तिघांची प्रकृती आणि डीएनए सारखाच आहे. अयोध्या हे सनातन धर्माच्या पवित्र शहरांमध्ये पहिले आहे. अयोध्येने हजारो वर्षांपासून जागतिक मानवतेचा मार्ग पवित्र केला आहे. अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे कोणीही युद्ध करण्याचे धाडस करू शकत नाही. श्रीरामांनी अयोध्येतील नागरिकांप्रती प्रेम व्यक्त केले होते. अयोध्येने त्यांना न्याय दिला नाही, परंतु श्रीरामांनी सर्व प्रकारचे संरक्षण दिले. जगात अयोध्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक उत्तम भारत घडवण्यासाठी आपण सर्व सहकार्य करू, असा विश्वास योगी यांनी व्यक्त केला.

मालदामधील हॉटेलमध्ये बांगलादेशींना प्रवेश बंदी!

‘इंडी’च्या खासदारांनी अदानींविरोधातील केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेस गायब!

उत्तरप्रदेश सरकार मदरसा कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत

मी ‘काडतूस’ आहे…झुकेगा नही!

“भगवान राम हे विष्णूचे अवतार आहेत. जानेवारीमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीने ५०० वर्षांच्या संघर्षानंतर राम लल्लाची पुनर्स्थापना झाली. श्रीरामाबद्दल आपली काय भावना आहे हे प्रत्येक गावात तुलसीने लिहिलेल्या रामचरित मानस रामलीलावरून कळू शकते. लोहिया हे राजकारणात आदर्श मानले जातात, आजचे समाजवादी कुटुंबवादी झाले आहेत आणि गुंडांच्या संरक्षणाशिवाय राहू शकत नाहीत. हे लोक तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण देवाला पूजनीय मानले असेल, तर त्याचा आदर्श आपण त्याच्या मानकांनुसार ठेवला पाहिजे,” असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा