नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी जाहीर झाला होता. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ केव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याची चर्चा सुरु झाली होती.
२५ मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. इकाना स्टेडियममध्ये दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह केंद्र सरकारचे मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, संघ आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे. २०० व्हीव्हीआयपी पाहुण्यांची यादी तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली
ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काश्मिरी पंडितांच्या अत्याचारास मुस्लिम जबाबदार!
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जपानचे पंतप्रधान येणार भारतात
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात पुन्हा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी यावेळी मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार हे अजून गुलदस्त्यात आहे. उत्तर प्रदेशमध्ये नवीन मंत्रीमंडळ आणि सरकार स्थापनेसाठी भाजपच्या बैठका आणि विचारमंथन सुरु आहे.