अतिक अहमदने बळकावलेल्या जमिनीवर बांधलेली घरे योगींनी केली सुपूर्द

७६ घरांच्या चाव्या कुटुंबाच्या केल्या स्वाधीन

अतिक अहमदने बळकावलेल्या जमिनीवर बांधलेली घरे योगींनी केली सुपूर्द

कुख्यात गुंड आतिक अहमद याने अतिक्रमित केलेली जागा उत्तर प्रदेश सरकारने ताब्यात घेऊन तिथे गरिबांसाठी उभारण्यात आलेली घरे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याहस्ते प्रयागराजमधील गरिबांना सुपूर्द करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शुक्रवारी ७६ घरांच्या चाव्या या लोकांना देण्यात आल्या.

 

ज्या जमिनीवर ही घरे बांधण्यात आली, ती घरे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाऊन पाहिली. त्यानंतर ज्यांना ती सुपूर्द करण्यात आली त्यांच्या मुलांशीही त्यांनी संवाद साधला. या ७६ घरांची जागा १७३१ चौरस मीटर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २६ डिसेंबर २०२१रोजी या घरांची पायाभरणी केली होती. या घरांसाठी ६०३१ लोकांनी अर्ज केले होते. पण त्यातील १५९० लोकच पात्र घोषित करण्यात आले. त्यानंतर लॉटरीच्या माध्यमातून फ्लॅट लोकांना उपलब्ध करून देण्यात आले.

 

लूकरगंज येथील या भूखंडावर प्रयागराज विकास प्राधिकरणाने (पीडीए) पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ७६ फ्लॅट उभारले. ९ जून रोजी आवास योजनेतील फ्लॅटची लॉटरी काढण्यात आली होती. शुक्रवारी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी या फ्लॅटची चावी गरिबांना देतील.

हे ही वाचा:

अमेरिकेतील कॉलेजांमधील आरक्षण बंद

‘मेक इन इंडिया’चा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभावशाली परिणाम

८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?

मागाठाणे जमीन खचल्याप्रकरणी दोघाना अटक व जामीन

कुख्यात गुंड आतिक अहमद याने लूकरगंज येथील सरकारी जमीन बळकावली होती. पीडीएने १३ सप्टेंबर २०२० रोजी या जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकले होते. उत्तर प्रदेश सरकारने या जमिनीवर गरिबांसाठी घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला होता. प्रयागराज येथे १६ सप्टेंबर २०२० रोजी या अतिक्रमणमुक्त केलेल्या जमिनींवर घरे बनवण्याची घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी २६ डिसेंबर २०२१ रोजी या आवास योजनेचे भूमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम झाला होता. त्यानंतर येथे ७६ फ्लॅटचे काम सुरू झाले. यासाठी पाच कोटी ६६ लाख ३७ हजार रुपये खर्च झाले आहेत.

यासंदर्भात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक म्हणाले की, आमचे सरकार अशा बळकावलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावरील अतिक्रमण हटवून त्याठिकाणी गरिबांसाठी घरे बांधणार. ती घरे नंतर त्या गरिबांना सुपूर्द करण्यात येणार. यावर्षी एप्रिल महिन्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद याची हत्या तुरुंगाच्या बाहेर झाली होती. त्याचा भाऊ अश्रफ अहमद यालाही हल्लेखोरांनी मारले होते. पत्रकार बनून हे हल्लेखोर आले होते.

 

आवास योजनेवर दृष्टिक्षेप

एका घरासाठी खर्च – सहा लाख रुपये
लाभार्थींना द्यावयाची रक्कम – साडेतीन लाख रुपये
घरे बनवण्यासाठी दीड लाख रुपये केंद्राकडून तर एक लाख रुपये राज्य सरकारकडून देण्यात आले
आवास योजनेसाठी एकूण सहा हजार ३० जणांचे अर्ज
पडताळणीनंतर केवळ १५९० अर्ज पात्र
९ जून रोजी १५९० अर्जधारकांपैकी ७६ जणांची फ्लॅटसाठी निवड
फ्लॅटचे बाजारमूल्य सुमारे १८ लाख रुपये

 

Exit mobile version