उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आपल्या राज्याची माफियांच्या तावडीतून पूर्ण सुटका करण्याचा निश्चय करून आले आहेत. इंडिया टीव्हीवरील ‘आप की अदालत’मध्ये त्यांनी आपल्या राज्याच्या प्रगतीविषयी, माफियाराजविषयी, मुस्लिमांच्या लांगुलचालनाविषयी खणखणीत वक्तव्ये केली.
मुख्तार अन्सारीला विष देऊन मारण्यात आले, असा आरोप केला गेला. या इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा यांनी विचारलेल्या प्रश्नावर योगी म्हणाले की, मुख्तार अन्सारीला मरायचे तर होतेच. ज्या व्यक्तीने शेकडोंना मारले कधीपर्यंत तो वाचणार. काँग्रेसने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केलाच. सपाचे लोक त्यांचे ‘आका’ होते. जेव्हा माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचा मृत्यू झाला तेव्हा या लोकांनी त्यांच्या मृत्यूनंतर एक अश्रुही ढाळला नाही. पण मुख्तार अन्सारीच्या घरी जाऊन खोटे अश्रु ढाळत होते. ४ जून नंतर आम्ही एक तारीख जाहीर करून उत्तर प्रदेश माफियामुक्त झाल्याची घोषणा करू.
योगी आदित्यानाथ म्हणाले की, माफियाकडून लुटलेली संपत्ती सरकार आपल्या ताब्यात घेणार आहे. आम्ही प्रयागराजमधून सुरुवात केली आहे. अतिक अहमदची संपत्ती ताब्यात घेतली आहे.
काँग्रेस, सपा भयभीत आहे त्या बुलडोझरने आम्ही सगळ्यांची सफाई केली. माफियांच्या संपत्तीवर गरिबांसाठी, महिलांसाठी, दिव्यांगांसाठी, निर्वासित मुलांसाठी घरे उभारण्यात येतील. रुग्णालये, शाळा बनविण्यात येतील.
माफिया आता मातीत मिसळला आहे. यानंतरही माफिया उभा राहणार नाही याची काळजी घेऊ. आता त्यांची संपत्ती जप्त केली आहे. नंतर त्यांच्या साथीदारांची संपत्ती जप्त केली जाईल.
राज्यात आता दंगली होत नाहीत, यावर बोलताना योगी म्हणाले की, जे दंगा करतील त्यांच्यावर लाठीमार होईल. आस्थेचा सन्मान व्हायला हवा. सात वर्षात एकही दंगा झाला नाही, कर्फ्यू लागला नाही. कावड यात्रा निघणार, पुष्पवर्षाही होणार. हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यामागे कारण हे आहे की, कावड यात्रेच्या मार्गाची माहिती घेण्यात येते. शिवाय, पुष्पवृष्टी करण्यामागे कारण हे की, न जाणो कुठे महादेव उभे असतील तर त्यांच्या चरणीही पुष्पवृष्टी होईल. योगी म्हणाले की, आम्ही मोहर्रमच्या मिरवणुकीतील उन्माद पाहिला आहे. त्यात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांवर बंदी घातली आहे. हे चालणार नाही. जो यात्रा काढेल त्याला प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. तोडफोड झाली, प्रतिज्ञापत्र दिले नाही तर सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी वसुली केली जाईल. हे आम्हाला करावे लागेल. हे भेदभावाशिवाय करणार. मी याआधीही बोललो आहे.
हे ही वाचा:
केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!
‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’
बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले
‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’
…तर तीन शिफ्टमध्ये नमाज पढा
रजत शर्मा यांनी विचारले की, रस्त्यावर नमाज पढले जातात त्यावर आपली भूमिका काय, तेव्हा ते म्हणाले की, रस्त्यावर नमाज पढली गेली तर हनुमान चालिसा मी रोखू शकणार नाही. २५ कोटी लोकांकडे मला लक्ष द्यायचे आहे. त्यांच्या रहदारीकडे मला लक्ष द्यायचे आहे. मशीद, मंदिरात तुमची प्रार्थना करा. रस्त्यावर नमाज नाही. हवे तर तीन शिफ्टमध्ये नमाज पढा. आता भोंगे उतरले आहेत. सगळे आरामात आपल्या परीक्षा देऊ शकतात. वृद्ध, मुले यांना आता त्रास होत नाही. आता मात्र उत्तर प्रदेशात सगळे शांत आहे. कायदा सगळ्यांसाठी आहे.
रजत शर्मा म्हणाले की, मौलाना सज्जाद यांनी सांगितले की, मोदींना हरविण्यासाठी मतदान करा. यावर योगी म्हणाले की, असा संदेश देणे दुर्दैवी आहे. मोदींनी कधी चेहरा, जाती बघून मते मागितली नाहीत. गरीब कल्याणकारी योजना सगळ्यांसाठी आहेत. काही कठमुल्ले, मौलवींकडून असे आवाहन केले जात आहे याचा अर्थ सगळ्यांनी लुंगी घालूनच जीवन व्यतित करावे असे यांना वाटते. कुणी वैज्ञानिक व्हावे असे यांना वाटत नाही.
वोट जिहादमधून जन्नत मिळणार नाही
सलमान खुर्शीद यांच्या भाचीने व्होट जिहादची भाषा केली यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, या वोटमधून जन्नत मिळणार नाही पण जहन्नुम मिळेल. संविधानानेच देश चालेल.