“झालेल्या प्रकारची लाज वाटते” योगेंद्र यादवांचे नक्राश्रू

“झालेल्या प्रकारची लाज वाटते” योगेंद्र यादवांचे नक्राश्रू

दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘स्वराज इंडिया’चे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी घडलेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारली आहे. “घडलेल्या प्रकारची मला लाज वाटते आणि मी या बाबत स्वतःला जबाबदार समजतो.” असे विधान योगेंद्र यादव यांनी केले आहे.

दिल्लीत दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने २६ जानेवारीला हिंसक रूप धारण केले. केंद्र सरकारने आणि दिल्ली पोलिसांनी आखून दिलेला मार्ग न पाळता, मध्य दिल्लीत आंदोलक घुसले. आंदोलकांनी ट्रॅक्टर्सच्या साहाय्याने पोलिसांनी ठेवलेली बॅरिकेडस उधळून लावली, तर दोऱ्या आणि लोखंडी उपकरणांच्या साहाय्याने सिमेंटचे अडथळे सुद्धा दूर केले. अनेक ठिकाणी दंगेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांच्या आणि पत्रकारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. ऐंशी पोलीस या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. सार्वजनिक वाहतूकीच्या अनेक बसेस फोडल्या. अनेक खासगी वाहनांची सुद्धा नासधूस केली.

काही दंगेखोर लाल किल्ल्यावर चढले आणि त्यांनी तिथे खलिस्तानचा झेंडा फडकावला. लाल किल्ल्यावर तैनात असलेल्या पोलिसांवर दंगेखोरांपासून वाचण्यासाठी किल्ल्यावरून खाली उड्या टाकण्याची वेळ आली.

या आंदोलनाच्या आयोजकांमध्ये योगेंद्र यादव हेदेखील एक मोठे नाव होते. योगेंद्र यादव अध्यक्ष असलेल्या स्वराज इंडियाने देखील या आंदोलनाचे समर्थन केले होते आणि अनेक शेतकऱ्यांना दिल्ली पर्यंत आणले होते.

Exit mobile version