कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पदावरुन पायउतार होणार असल्याचे सांगितले आहे. आज दुपारी राज्यपालांना भेटून राजीनामा देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येडियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
२६ जुलैला येडियुरप्पा सरकार दोन वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बीएस येडियुरप्पा यांनी भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही स्थगिती दिली आहे. येत्या रविवारी एका आलिशान हॉटेलमध्ये डिनर आयोजित करण्यात आलं होतं. गेल्या आठवड्यात बीएस येडियुरप्पा यांनी दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. त्यावेळी मात्र येडियुरप्पांनी नेतृत्वबदलाच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या.
I have decided to resign. I will meet the Governor after lunch: Karnataka CM BS Yediyurappa at a programme to mark the celebration of 2 years of his govt pic.twitter.com/sOn0lXAfeD
— ANI (@ANI) July 26, 2021
येडियुरप्पा हे कर्नाटकातील लिंगायत समजतील सर्वात मोठे नेते आहेत. त्यांच्यामागे लिंगायत समाज हा खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे आता नवा मुख्यमंत्री कोण हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाजपाची २०१४ नंतरची परंपरा ही माहित नसलेली नावं पुढे आणण्याची आहे. त्यामुळे आता नवीन मुख्यमंत्री लवकरच निवडण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले
कारगिल हुतात्म्यांना देशवासियांकडून श्रद्धांजली
निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा
जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!
नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी यांचं सरकार २३ जुलै २०१९ रोजी कोसळलं होतं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी बहुमत सिद्ध करु शकले नव्हते. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार आलं. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त ९९ मतं तर विरोधात १०५ मतं पडली होती. बीएस येडियुरप्पा यांनी २६ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.