26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाहोय, यासिन मलिक दहशतवादी कृत्यात सहभागी होता!

होय, यासिन मलिक दहशतवादी कृत्यात सहभागी होता!

Google News Follow

Related

दहशतवाद  आणि फुटीरतावादी कारवायांमुळे सध्या तुरुंगात असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने आपण दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयात कबूल केले आहे.

काश्मीर खोऱ्यात २०१७मध्ये अशा कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप यासिन मलिकवर आहे. त्याच्यावर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १६ (दहशतवादी कारवाया), कलम १७ (दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणे), कलम २० (दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे) आणि कलम १२० बी (कटकारस्थान) आणि १२४ अ (देशद्रोह) हे आरोप असून त्याचा बचाव करण्यास त्याने नकार दिला.

विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रवीण सिंग यांनी याआधी यासिन मलिक आणि इतर साथीदार दहशतवादी कृत्यांसाठी निधी मिळवत असल्याबद्दल प्रथमदर्शनी दोषी ठरविले होते. आता यासंदर्भातील पुढील सुनावणी १९ मे रोजी होणार आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदविले होते की, यासिन मलिकने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया तसेच इतर बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी निधी गोळा करण्याकरिता जगभरात एक यंत्रणा उभी केली होती.

हे ही वाचा:

‘ ठाकरे सरकारविरोधात राज यांनीही लढावे’

महसूल गुप्तचर संचालनालयाने हाणून पाडले सोन्याच्या तस्करीचे प्रयत्न

‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!’ राज ठाकरेंचा लेटरबॉम्ब

महापालिका निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार

दरम्यान, न्यायालयाने काश्मीरी फुटीरतावाद्यांमधील फारुख अहमद दार तथा बिट्टा कराटे, शब्बीर शाह, मसरत आलम, मोहम्मद युसूफ शाह, अल्ताफ अहमद शाह, आफताब अहमद शाह, नईम खान, मोहम्मद अकबर खांडे, राजा मेहरजुद्दीन कलवाल, बशीर अहमद भट, झहूर अहमद शाह वताली, शब्बीर अहमद, शाह, अब्दुल रशीद शेख आणि नवल किशोर कपूर यांच्याविरोधातही न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.

लष्कर ए तैय्यबाचा(एलईटी) संस्थापक हाफिज सईद व हिजबुल मुजाहिदिनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांच्याविरोधातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

न्यायाधीशांनी याआधी म्हटले होते की, साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार एका योजनेअंतर्गत या कारवाया झाल्या. त्यात पाकिस्तान व त्यांच्याशी संबंधित संघटना तसेच या आरोपींचे ध्येय एकच होते. हे ध्येय गाठण्यासाठी ज्या माध्यमांचा वापर करायचा होता त्यातही एकवाक्यता होती. पाकिस्तानकडून दहशतवाद पसरविण्यासाठी निधीचा पुरवठा केला जाणार होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा