‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. त्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आल्याचे शिवसेना नेत्यांनी म्हटले होते. मात्र, या प्रकरणी आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. या समोर आलेल्या माहितीनंतर यशवंत जाधव यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये यशवंत जाधव यांनी केलेल्या व्यवहाराच्या काही नोंदी समोर आल्या आहेत. २०१८ ते २०२२ या कालावधीतील या नोंदी आहेत. नोंदीनुसार २ कोटी मातोश्रीला दिले. ५० लाखांचे घड्याळ मातोश्रीला दिले, अशा काही नोंदी या डायरीमध्ये आढळून आल्या आहेत. मात्र, या डायरीमध्ये मातोश्रीचा असलेला उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले आहे. मात्र, या नोंदींमुळे यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अतुल भातखळकर म्हणे की, “मी या पूर्वीच म्हटले होते. नोकराकडे एवढे तर मालकाकडे किती असतील. आता मातोश्री म्हणजे माझी आई असं हे सांगत आहेत. पण, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, कोण मातोश्री,” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली. “यशवंत जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच जर आपल्या आईला इतके पैसे आणि महागडे घड्याळ दिले असेल तर धन्य ती माता,” असा टोला त्यांनी यशवंत जाधव यांना लगावला आहे.

हे ही वाचा:

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

“मुंबईतील शाळांची जी दुरावस्था आहे, रस्त्यांची जी ही परिस्थिती आहे. ती अशी परिस्थिती का आहे याचेच हे उत्तर आहे,” असे भातखळकर म्हणाले. तसेच या माहितीच्या आधारे यशवंत जाधव यांची चौकशी व्हावी, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी ईडीला गेली आहे.

Exit mobile version