दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटाकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.महायुतीमध्ये या जागेवरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.अखेर शिवसेना शिंदे गटाला ही जागा मिळाली शिंदे गटाकडून भायखळाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमदेवारी दिली आहे.त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत यांच्या विरुद्ध यामिनी जाधव असा सामना होणार आहे.दक्षिण मुंबईची जागा कोण लढणार याबाबत भाजप-शिंदे शिवसेना यांच्यात चर्चा सुरूच होती.या जागेकरिता भाजपकडून देखील अनेकांची नावे समोर आली होती.त्यामध्ये राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा होती.मात्र, शिंदे गटाला ही जागा मिळाली असून शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!
कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?
काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने केली ‘व्होट जिहाद’ ची घोषणा
शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?
दरम्यान, यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार आहेत. या अगोदर त्यांनी मुंबई महापालिका नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. तसेच त्या बीएमसी बाजार उद्यान समितीच्या अध्यक्षही राहिल्या आहेत. यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे देखील शिंदे गटात आहेत.यशवंत जाधव हे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे गट नेतेही होते.