मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत. जवळपास १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना Y दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
खासदार हेमंत गोडसे, कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इतर खासदारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. खासदारांचे कार्यालय आणि घराला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होत आहे.
हे ही वाचा:
“शरद पवारांनी वेळ साधून शिवसेना फोडली”
एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?
मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी
गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन
त्यानंतर आता थेट शिवसेना भवनावर दावा करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘टीव्ही ९’ने दिली होती. तसेच स्वतःचीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दोन तृतीयांश आमदारांनी बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची, नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. खासदारही आता एकनाथ शिंदे यांची साथ देत असल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.