WWE सुपरस्टार ग्रेट खली भाजपामध्ये

WWE सुपरस्टार ग्रेट खली भाजपामध्ये

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट अर्थात डब्ल्यू डब्ल्यू ई (WWE) मधला प्रसिद्ध कुस्तीपटू ग्रेट खली यांनी आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे. खलीने आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला आहे. खली हिमाचल प्रदेशचे रहिवासी असून त्यांचे खरे नाव दलीप सिंह राणा असे आहे.

दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दलीप सिंह राणा उर्फ ग्रेट खली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने आपण प्रभावित झाल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

मुंबई विद्यापीठाच्या निर्णयावर मंगेशकर कुटुंबीय नाराज

बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स

कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड

भाजपामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला आनंद होत असल्याचे ते म्हणाले. या जगाच्या पाठीवर क्वचितच एखादा देश उरला असेल जिथे मी रेसलिंग केली नाही. पैसे कमवण्यासाठी मी अमेरिकेमध्ये होतो. पण मी भारतात परत आलो. कारण भारत देशाच्या प्रती माझ्या हृदयात प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला अतिशय योग्य प्रधानमंत्री लाभले आहेत. त्यामुळे मला वाटले की देशात राहून त्यांच्यासोबत या देशाला पुढे नेण्यासाठी मी माझे योगदान देऊ शकतो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेने प्रभावित झालो आहे असेही त्याने नमूद केले.

सध्या देशभर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना या पार्श्‍वभूमीवर ग्रेट खली यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे हे भाजपासाठी फायद्याचे मानले जात आहे. विशेषतः पंजाबमध्ये निवडणूक प्रचारासाठी भाजपा खली यांचा वापर करू शकते.

Exit mobile version