राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना लैंगिक शोषण प्रकरणात जामीन मिळाला आहे. दिल्लीच्या न्यायालयाने हा जामीन त्यांना दिला. मंगळवारी त्यांना दोन दिवसांचा अंतरिम जामीन दिला होता. न्यायालयाने कुस्ती महासंघाचे निलंबित सचिव विनोद तोमर यांनाही जामीन दिला आहे.
न्यायालयाने दोघांसाठी २५ हजारांचा जामीन मंजूर केला. पण हा जामीन देताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या प्रकरणातील पीडित किंवा साक्षीदार यांच्याशी संपर्क करू नये तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जुलैला होईल.
हे ही वाचा:
जैन साधूंच्या निघृण हत्याकांडा विरोधात विशाल मौन रॅलीचे आयोजन !
विनेश, बजरंगच्या निवडीविरोधात खेळाडू, पालकांचे आंदोलन
वकार यूनुसची दर्पोक्ती; पाक म्हणे भारताला जगात कुठेही हरवू शकतो
मणिपूर: महिलांची नग्न धिंड प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक !
सहा महिला कुस्तीगीरांनी बृजभूषण यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. स्पर्धांची तयारी करताना शिबिरात किंवा स्पर्धांदरम्यान त्यांनी लैंगिक छळ केल्याचे हे आरोप आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत एफआयआर दाखल केला असून १५ जूनला ३५४, ३५४ अ, ३५४ ड आणि ५०६ या कलमाअंतर्गत हा एफआयआर दाखल केला आहे.
तोमर यांच्यावर १०९, ३५४, ३५४ अ, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक या खेळाडूंसह काही खेळाडूंनी बृजभूषण यांच्याविरोधात आंदोलन केले होते. जानेवारी महिन्यात त्यांनी सर्वप्रथम आंदोलन केले नंतर ते मागे घेण्यात आले. नंतर पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर गोळा होत बृजभूषण यांच्या अटकेची मागणी केली. नंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला. पीडित खेळाडू व बृजभूषण यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले