कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये

काही दिवसांपूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची घेतली होती भेट

कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये

हरियाणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू असतानाचं आता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी राजकारणात पाऊल ठेवले आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर पुनिया आणि फोगाट यांनी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, विनेश फोगाट हिने शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेतील तिच्या पदाचा राजीनामा दिला. तिने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे, “माझ्या आयुष्यातील या टप्प्यावर, मी स्वतःला रेल्वे सेवेपासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला असून माझा राजीनामा रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. देशाच्या सेवेत मला रेल्वेने दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराची सदैव ऋणी राहीन.”

कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली तेव्हाच हे दोघे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशापूर्वी विनेशचा शेतकरी आंदोलनात सहभाग विनेशने नुकतीच शंभू आणि खनौरी सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. यावेळी विनेशला तू निवडणूक लढवणार का? असा सवाल केला होता. त्यावर तिने उत्तर दिले की, तिला राजकारण कळत नाही. पण शेतकऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.

विनेश फोगाटने नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण अंतिम फेरीच्या आधी झालेल्या वैद्यकीय चाचणीत विनेशचं वजन १०० ग्रॅम जास्त आढळल्याने तिला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं होतं. यामुळे विनेशचे ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न अधुरे राहिले.

हे ही वाचा : 

‘शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ, लिंबाच्या झाडाकडून गोड फळाची अपेक्षा करणे गैर’

जम्मू काश्मीर निवडणूक: पंतप्रधान मोदी, गडकरींसह ४० नेत्यांकडे सूत्रे !

केनियामध्ये शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

चाकरमानी निघाले गावाला; वाहतूक कोंडीचा ताप डोक्याला

हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोंबर रोजी मतदान केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासोबत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार होते आणि ४ ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांतील निकाल जाहीर होणार होता. मात्र, हरियाणामध्ये आता ५ ऑक्टोंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर येथील निकाल जाहीर होणार आहेत.

Exit mobile version