सोळा वर्षे झाली, निष्क्रियतेची ‘मिठी’ कधी दूर होणार?

सोळा वर्षे झाली, निष्क्रियतेची ‘मिठी’ कधी दूर होणार?

२६ जुलै २००५ च्या मुंबईतील महाप्रलयानंतर मिठी नदी रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. आज या गोष्टीस १६ वर्षे पूर्ण झाली. मिठी नदी रुंदीकरणासाठी चार टप्प्यामध्ये रुंदीकरणाचे काम विभागण्यात आले. परंतु आज १६ वर्षानंतरही यातील एकाही टप्प्याचे मिठी नदीचे रुंदीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही.

प्रशासनाने रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला; स्थायी समितीने त्यास मंजुरी दिली; प्रशासनाने कंत्राटदारास कार्यादेश दिले परंतु प्रत्यक्ष स्थळी कामच होऊ शकलेले नाही. मिठी नदीच्या किनारी असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात / निष्कासित करण्यात महापालिका प्रशासनास १६ वर्षानंतरही यश आलेले नसल्यामुळे मिठी नदीचे रुंदीकरण केवळ कागदावर राहिलेले आहे, असे मुंबई महानगरपालिकेतील भाजपा गटाचे प्रभारी आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी म्हटले आहे. त्यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मिठी नदीच्या बाबत झालेल्या या दिरंगाईची आठवण करून दिली आहे.

या वर्षी पडलेल्या पावसामध्ये मिठी नदीने रौद्र रूप धारण केलेले होते. आणि नदीच्या किनाऱ्यालगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली होती. पाऊस थांबल्यानंतर आणि ओहोटी असतांना सुद्धा मिठी नदी ही तुडूंब भरलेली होती. त्यामुळे पार्ले, सांताक्रुज, खार, वांद्रे आणि माहीम तसेच कुर्ला, धारावी आणि सायन या सर्व विभागातील नाले / नद्या तुडूंब भरलेल्या होत्या. आणि पाण्याचा निचरा ७ ते ८ तास होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता मिठी नदीचे रुंदीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन याबाबत अद्यापही उदासीन आहे असे दिसते. तरी याबाबत आपण संयुक्त बैठक घेऊन अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत सुयोग्य कार्यवाही युध्दपातळीवर करणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा:

चौकडी विकत होती बनावट ‘ब्रँडेड’ घड्याळे

या दोन केंद्रीय मंत्र्यांनी घेतला माटुंग्यात डोशाचा आस्वाद

काबूलमध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

ब्राह्मणविरोधी वक्तव्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक

अन्यथा मिठी नदीस आलेल्या पुरास आणि पुरापासून झालेल्या पूरग्रस्तांच्या नुकसानीस, वित्तहानीस व जीवितहानीस आपण महापालिका आयुक्त म्हणून जबाबदार असाल आणि त्याबद्दल मुंबई भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे.

Exit mobile version