वर्षभरापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन या आठवड्यात संपुष्टात येत असल्याने आता प्रश्न आहे की, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे पुढे काय? आगामी उत्तर प्रदेश निवडणूक लढवणार का?
शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते त्याचबरोबर भारतीय किसान युनियन (BKU), केंद्राने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने आणि तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द केल्याने संपलेल्या आंदोलनाचा तो एक चेहरा आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत त्यांची योजना काय आहे? असे विचारले असता, ते लवकरच त्यांच्या समर्थकांना स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तथापि, रविवारी राकेश टिकैत यांनी सांगितले की त्यांची संघटना बीकेयू राजकीय पक्ष बनणार नाही. त्याचबरोबर आगामी निवडणुकीत कोणालाही पाठिंबा देणार नाही.
राकेश टिकैत यांनी ‘पश्चिम उत्तर प्रदेशातील हिंदू आणि मुस्लिमांमधील विभाजन’ यावर देखील भाष्य केले. त्यांनी दावा केला की ही दरी आता संपली आहे.
ते म्हणाले की BKU ने समुदायांमध्ये एकतेसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि जे लोक विभाजनाचा फायदा घेतात त्यांना यावेळी फायदा होणार नाही.
हे ही वाचा:
ठेवीदारांचे पैसे बँकांमध्ये सुरक्षित
संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल
मुंबई महापालिकेत वाहते भ्रष्टाचाराची गटारगंगा
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
२०१३ साली समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना पश्चिमी उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर-शामली या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम दंगली उसळल्या होत्या. पश्चिमी उत्तर प्रदेश या भागात मोठ्या प्रमाणात जाट समुदायाचे प्रभूत्व आहे. शेतकरी आंदोलनामध्येही हाच समाज मोठ्या प्रमाणात सक्रिय होता.