विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’

सदनात घुमणार आज महिला आमदारांचा आवाज

विधानसभेत आज होणार ‘महिला लक्षवेधी’

‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. आजच्या महिला दिनानिमित्त सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला सदस्य या धोरणाविषयी सूचना मांडणार आहेत. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज महिला दिनानिमित्त राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा केली जाणार आहे. दोन्ही बाजूच्या सदस्य या धोरणासंदर्भात सूचना मांडणार आहेत.

विधानसभेत आज आठ लक्षवेधी सूचना दाखवण्यात आल्या आहेत. त्यापैकी सात लक्षवेधी हि महिला आमदारांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये देवयानी फरांदे, यशोमती ठाकूर, भारती लव्हेकर, मंदा म्हात्रे , यामिनी जाधव, श्वेता महाले, जयश्री जाधव आणि सरोज अहिरे या महिला आमदारांचा यामध्ये समावेश असणार आहे. या सर्व महिला आमदारांच्या योग्य अशा सूचनांचा समावेश करून ते धोरण अर्थसंकल्पीय अधिवेशनातूनच मंजूर होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळांत महिला धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. पण त्याला विधिमंडळाची मंजुरी ना मिळताच सरकार कोसळले होते.

महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा आज महिला दिनीच महिला धोरण मंजूर व्हावे असा प्रयन्त असणार आहे. पण या धोरणामध्ये अधिक काही सूचनांचा समावेश व्हा वा अशी मागणी महिला आमदारांची मागणी होती. याशिवाय विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पण आग्रह केला आहे. सर्व आमदारांच्या योग्य सूचनांचा समावेश करून ते धोरण चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच मंजूर करून देण्याचा सरकारचा प्रयन्त असेल. मुख्य म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महिला दिनाचे औचित्य साधून यासाठी पुढाकार घेतल्याचे काळात आहे.

हे ही वाचा:

औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?

आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”

आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’

इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर

काय असतील महिला धोरण वैशिष्ठय ?
सर्व क्षेत्रांत महिलांना समान संधी
स्त्री -पुरुष जन्मदर सामान ठेवण्यासाठी उपाय योजना
पुरुष प्रधान मानसिकता बदलून महिलांना सर्वागीण विकासासाठी प्रगतिक दृष्टिकोन रुजवणे.
जात, सत्ता, प्रदेश, आणि धर्म यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेविरोधात त्यांना पाठबळ देणे. आणि उपाययोजना राबवणे.
शासनाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांच्या हिताच्या आणि हक्क जपून त्यांचे जाणीवपूर्वक प्रयन्त करणे.
आधुनिक आणि स्वबळावर महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देणारी नवीन प्रतिमा तयार करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे

 

Exit mobile version