लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत

आता २१ सप्टेंबरला हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत

२० सप्टेंबर हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. संसदेत या दिवशी महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले आणि ४५४ खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर अवघ्या २ खासदांनी या विधेयकाला विरोध केला. हे दोन खासदार एमआयएमचे होते अशी चर्चा सुरू झाली. कारण या आरक्षण विधेयकाला असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध केला होता. मुस्लिम महिलांना यात आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती.

 

 

आता २१ सप्टेंबरला हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तिथेही त्याला मान्यता मिळेल अशीच सध्याची स्थिती आहे. हे विधेयक संमत झाल्यामुळे राजकारणात निवडणुकीत आता ३३ टक्के आरक्षण महिलांना लागू होणार आहे. अर्थात, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्वरित होणार नाही. मात्र गेली अनेक वर्षे या प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले होते. मोदी सरकारने हा प्रश्न धसास लावला.

 

 

लोकसभेत यासंदर्भात बुधवारी मतदान घेण्यात आले त्यावेळी ४५४ खासदारांनी या विधेयकाच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. केवळ दोन खासदार म्हणजे एमआयएम पक्षाच्या खासदारांनी त्याला विरोध केला. मुस्लिम महिलांना या आरक्षणात स्थान मिळावे अशी मागणी एमआयएमने केली होती. तशा प्रकारची दुरुस्तीही त्यांनी सुचविली होती, पण त्याला सभागृहाने विरोध केला. त्यामुळे ओवेसी यांचे म्हणणे फोल ठरले.

 

हे ही वाचा:

शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !

सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ

आता खिचडी घोटाळ्यात गजानन कीर्तिकरांच्या मुलाचे नाव !

खालिस्तानी गुरपतवंत सिंह पन्नूकडून भारतीयांना धमकी

बुधवारच्या दिवशी या विधेयकावर सविस्तर चर्चा झाली. विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षांनी यावर चर्चा केली. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शविला. पण सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांचे स्वप्न पूर्ण झाले म्हणत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.

 

 

त्यावर स्मृती इराणी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या की, जेव्हा आपण नव्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपण गृहलक्ष्मीची पूजा करतो. अनेक घरात गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे तर काही ठिकाणी पदचिन्हे दिसतात. नव्या संसदभवनात प्रवेश करताना हे विधेयक आणणे हे त्याचेच चिन्ह आहे. त्या म्हणाल्य़ा की, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून महिलांच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला.

Exit mobile version