काँग्रेसच्या जाहीरनाम्यात प्रत्येक महिलेच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये मिळतील, असे आश्वासन देण्यात आले होते. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर या आश्वासनाची पूर्ती करण्याची मागणी महिला करत आहेत. नवी दिल्लीत काही महिलांनी आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा आणि संजय सिंग यांना घेराव घातला. तसेच, काँग्रेसने दिलेले एक लाख रुपयांचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली.
लखनऊ येथे काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक मुस्लिम महिलांनी रांगा लावत काँग्रेसने दिलेल्या गॅरंटी कार्डवरून आपल्याला पैसे मिळावे अशी मागणी केली होती. कर्नाटकातही असेच चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या या जाहीरनाम्यातील आश्वासनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांना भेटण्यासाठी निघालेले आप नेते राघव चड्ढा आणि संजय सिंह यांच्या गाडीला दिल्लीतील अनेक महिलांनी घेराव घातला व राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महिला मतदारांना एक लाख रुपयांची भरपाई मिळावी, अशी मागणी केली. राहुल गांधींनी दिलेल्या वचननाम्यानंतर लखनऊमधील असंख्य महिलांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा लावल्या होत्या.
निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रत्येक गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला वार्षिक एक लाख रुपये देण्याचे वचन देऊन अनेक घरांना ‘गॅरंटी कार्ड’ वितरित केले होते. फुटेजमध्ये मुस्लिम महिला मोठ्या संख्येने तळपत्या उन्हात लखनऊमधील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या दिसल्या होत्या. काही महिलांनी ‘गॅरंटी कार्ड’ मागितले, तर इतर ज्यांना ते आधीच मिळाले होते त्यांनी वचन दिलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी फॉर्म सादर केले. काहींनी त्यांचा तपशील दिल्यानंतर काँग्रेस कार्यालयातून पावत्या मिळाल्याचा दावा केला.
हे ही वाचा:
शेअर्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींचे शेअर्स वधारले
१८व्या लोकसभेचे पहिले सत्र जूनच्या तिसऱ्या आठवड्यात
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हाय अलर्टवर; परिसर नो फ्लाय झोन घोषित
पवई दगडफेक; ५७ जणांची रवानगी तुरुंगात,६ महिलांचा समावेश
काँग्रेसने निवडणुकीपूर्वी ‘घर घर हमी’ कार्यक्रम सुरू केला होता. यापैकी एक होती महालक्ष्मी योजना. या योजनेनुसार, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांच्या महिला प्रमुखांच्या खात्यात थेट साडेआठ हजार रुपये प्रति महिना दिले जातील, असे वचन देण्यात आले होते.