बीडमध्ये भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज विजयादशमीनिमित्त सावरगावमधील भगवान गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी जमलेल्या समर्थकांना संबोधित केले. हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड आणि अडचणींवर मात करत पंकजा मुंडे थोड्या विलंबाने कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. गेल्या दोन महिन्यात राज्यात अनेक बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. यातील अनेक घटनांमध्ये महाविकास आघाडीचे नेतेच आरोपी असल्याचे समजले आहे. यावेळी जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचार, बलात्कार होत आहेत.”
याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. त्याचबरोबर मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते. आजची दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून इथे आले आहात.” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पंकजा मुंडे मेळाव्यात बोलताना म्हणाल्या की, “आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते.” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
भारताची तालिबानशी चर्चेला तयारी?
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा!
काश्मीरमध्ये चकमक सुरूच; एका अधिकाऱ्याला आणि जवानाला वीरमरण
सरसंघचालकांनी केले अखंड भारताचे सूतोवाच
“आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं. आमचं म्हणणं आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण सध्या राज्यात काय चाललंय? राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचार, बलात्कार होत आहे. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.