29 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरक्राईमनामासंजय राठोड करतो लैंगिक छळ...यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र

संजय राठोड करतो लैंगिक छळ…यवतमाळ पोलिसांना पीडित महिलेचे पत्र

Google News Follow

Related

राज्यभर गाजलेल्या पूजा चव्हाण प्रकरणात संशयाची सुई ज्याच्याकडे आहे असे शिवसेनेचे नेते, माजी मंत्री आमदार संजय राठोड याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय राठोड याच्या विरोधात एका महिलेने गंभीर आरोप केल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. संजय राठोड आपला लैंगिक छळ करत असल्याचे आरोप या महिलेने केले आहेत.

महिलांच्या हक्कांसाठी कायम आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. चित्रा वाघ यांनी या पीडित महिलेच्या तक्रारीच्या पत्राचे फोटो ट्विटरवर टाकले आहेत. यवतमाळ पोलिसांना हे पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात आरोपी म्हणून माजी मंत्री संजय राठोड याचे नाव लिहिले आहे. आपल्या पतीस नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी संजय राठोड याने शरीरसुखाची मागणी केली आणि त्यास नकार दिल्यावर आपला लैंगिक आणि मानसिक छळ केला असा आरोप या महिलेने केला आहे. तसेच राठोड हा शारीरिक त्रास देत असल्याचेही या महिलेने म्हटले आहे.

यवतमाळ पोलिसांना पोस्टाद्वारे ही तक्रार पाठवली असल्याचे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ही तक्रार करण्यात आली तेव्हा संजय राठोड मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली नाही असे चित्रा वाघ यांचे म्हणणे आहे. तर आजही संजय राठोड आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो असे आरोप पीडित महिलेने केले आहेत.

हे ही वाचा:

शिक्षणसम्राट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुडघे

सरकार आहे की सर्कस?

राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

आधीच पूजा चव्हाण प्रकरणामुळे संजय राठोड हे अडचणीत आहेत. त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पण या प्रकरणाशी संबंधित समोर आलेल्या ध्वनिफितीतील आवाज हा संजय राठोड यांचा असल्याचे सांगितले जात आहे. त्यात आता संजय राठोड यांच्यावर आणखी आरोप झाल्यामुळे या प्रकरणात राठोडांवर गुन्हा दाखल केला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा