काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा

राजस्थान, छत्तीसगड आदी काँग्रेसशासित राज्यांमध्ये बलात्काराच्या घटना घडल्यावर पीडित कुटुंबाला भेटायला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जाणार नाहीत. कारण तेथे काँग्रेसचे सरकार आहे. बलात्काराच्या घटनेवर राजकारण करणारे राहुल गांधी आता बहुधा झोपलेले असावेत. जागे असले तरी ते ऐकणार नाहीत किंवा आंदोलन करणार नाहीत. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या बलात्कारांनंतर तिथे राजकारण करण्यासाठी राहुल, प्रियांका बहीण भाऊ धावाधाव करत होते, पण आता राजस्थानमध्ये झालेल्या बलात्कारांनंतर ते तिथे ढुंकूनही पाहत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात एका दलित महिलेवर दोन गुंडांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची तक्रार पीडितेने पोलीस ठाण्यात केली, मात्र अद्याप दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. दोन्ही आरोपी फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील कांचनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका २६ वर्षीय दलित महिलेने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती आपल्या मुलगा आणि पतीसह शेतातून मोहरी कापून घरी येत होती, तेव्हा वाटेत काही लोकांनी तिला घेरले. त्याला विरोध केल्यावर आरोपीने तिच्या पतीवर चाकूने वार करून जखमी केले. आरडाओरडा केला, मात्र नराधमांनी कोणाचेही न ऐकता तिच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा:

…. म्हणून मविआ नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही!

चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया

एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

घटनेनंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. महिलेची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका मंत्र्याने ‘बलात्काराच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. तसंच राजस्थान हे मर्दांच राज्य आहे’ असं बोलून वाद निर्माण केला होता. या विधानावर भाजपने आक्षेप घेतला होता. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोनुसार २०२० मध्ये सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून ५ हजार ३१० महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद आहे.

Exit mobile version