एकीकडे केंद्राकडून लसी मिळत नाहीत म्हणून आरडाओरडा करणारे महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आता लसीकरणात पुन्हा एकदा आघाडीवर असल्याचे कौतुक करताना थकत नाही. जवळपास अडीच कोटी नागरिकांना महाराष्ट्रात लसीकरण झाले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. त्यांनी २ कोटी १५ लाख ६५ हजार नागरिकांना लस दिली आहे. महाराष्ट्रात दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्याही ५० लाखांच्या घरात आहे.
यासंदर्भात भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारच्या या लबाडीवर बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात अडीच कोटी नागरीक लसवंत झाले आहेत. पण राज्य सरकारने एकही लसीचा डोस विकत घेतला नाही. केंद्राने लस पुरविली म्हणूनच अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण होऊ शकले ना? तरीही रोज उठून वसुली सरकारचा बेशरम थयथयाट का सुरू होता?
हे ही वाचा:
संभाजीराजे छत्रपतींनी मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करू नये
बाळासाहेबांनीच स्वतःचं नाव देणं नाकारलं असतं
कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट
स्थलांतरित मुस्लिमांना कुटुंब नियोजनाचा सरमा यांचा सल्ला
महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे. मात्र या सगळ्या लसी केंद्राकडूनच सर्व राज्यांना मिळाल्या आहेत. पण केंद्राचे आभार मानायला मात्र ठाकरे सरकार सोयीस्कररित्या विसरले आहे.
महाराष्ट्र लसीकरणात सर्वात पुढे; अडीच कोटी नागरिक झाले लसवंत…
राज्य सरकारने लसीचा एकही डोस खरेदी केला नाही. केंद्राने लस पुरवली म्हणूनच अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण झाले ना? तरीही रोज सकाळी उठून वसुली सरकारचा बेशरम थयथयाट का सुरू होता? pic.twitter.com/6AM2qUatYI— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 11, 2021
स्वतःची पाठ थोपटून घेताना केंद्रामुळे लसींचा तुटवडा भासतो, अशी टीका सातत्याने महाविकास आघाडीकडून करण्यात आली. पण उपलब्ध लसींच्या माध्यमातून देशाता आघाडीवर राहताना मात्र त्याचे श्रेय महाविकास आघाडीने स्वतःकडेच घेतले आहे. मध्यंतरी ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून परदेशातून लसी खरेदी करण्याचे प्रयत्न ठाकरे सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने केले. पण हे प्रयत्न पुरते फसले. त्यामुळे आता केंद्राकडून मिळणाऱ्या लसींवरच सगळे लसीकरण सुरू आहे.