महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रा दिनानिमित्त मराठीतून समस्त मराठी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे. अमित शहा यांनी ट्वीटरवरून या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याबरोबरच भाजपातील इतरही काही नेत्यांनी महाराष्ट्रातील समस्त जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमित शाह यांनी ट्वीट करताना म्हटले आहे.

स्वधर्म-स्वदेशासाठी लढण्याचे संस्कार देणारी, शूरवीर, क्रांतिकारक व समाजसुधारकांची पवित्र भूमी, अशा महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना ‘महाराष्ट्र दिना’च्या शुभेच्छा. महाराष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर राहो, ह्या सदिच्छेसह राज्यातील सर्वांच्या कल्याण व निरोगी आयुष्याची मी प्रार्थना करतो!

हे ही वाचा:

‘न्यूज डंका हिंदी’ नेमका कसा असणार?

बंगालची विधानसभा निवडणूक आणि संभाव्य  निकाल

प्रशांत किशोर संन्यास घेणार की यु टर्न?

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या खरंच कमी झाली?

त्यांच्यासोबतच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील समस्त महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,

ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांचा भक्कम वारसा असलेल्या महाराष्ट्र राज्याने आपल्या प्राचीन संस्कृतीचा हा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहासही प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीटरवरून समस्त मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिल्या आहेत. ते म्हणतात,

जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा!

भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यात ते म्हणतात,

१ मे १९६०… संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले तेव्हा महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. त्या हुतात्म्यांना अभिवादन करून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Exit mobile version