आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

१९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन आहे.

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होतं आहे. दोन-तीन वर्षांच्या खंडानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. सत्तांतरानंतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात कसोटी असणार आहे. तसेच सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पहिल्यांदा आमनेसामने येणार आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारचं पहिले हिवाळी अधिवेशन आहे. १९ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत हे अधिवेशन आहे. या अधिवेशनात महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, महापुरुषांबाबतची अपमानास्पद वक्तव्ये, राज्यपालांचा राजीनामा, महिला सुरक्षा यावरून विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. अजित पवार, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित असतील. सरकारने रविवारी जाहीर केल्याप्रमाणे नवं लोकायुक्त विधेयक आजच सभागृहात मांडलं जाणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. नागपुरात अधिवेशन सुरू असताना अनेक मोर्चे, निदर्शनं विधीमंडळाबाहेर करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. यंदा सुमारे मोर्चांची संख्या ६१ हून अधिक आहे.

हे ही वाचा:

‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’

चुकीच्या विधानामुळे किरण रिजिजूनी राहुल गांधींना फटकारले

६० दिवस २२ पोलिस घेत आहेत मुलीचा शोध

हिजाबला विरोध करणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला अटक

दरम्यान, सरकार नागपूरमध्ये दाखल होताच नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिला आहे. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा, असं नक्षलवाद्यांनी म्हटलं आहे. सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा असं आवाहन नक्षलवाद्यांनी दिले आहे.

Exit mobile version