आज पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून संसादेच्या दोन्ही सभागृह अर्थात लोकसभा आणि राज्यसभा कार्यान्वित झाली आहेत. संसदेच्या या अधिवेशनात काय महत्त्वाच्या गोष्टी होणार साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. तर या अधिवेशनात कोणती महत्त्वाची बिले आणि कायदे संसदेत पारित केली जाणार याकडेही साड्यांच्या नजर आहे.
सोमवार, २९ नोव्हेंबर पासून सुरु झालेले संसदेचे अधिवेशन २३ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान या अधिवेशनात केंद्र सरकारने पारित केलेले तीन नवे कृषी कायदे मागे घेतले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर संसदेच्या या अधिवेशनात त्या संदर्भातील कार्यवाही होऊ शकते.
हे ही वाचा:
महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली! साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?
भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
काँग्रेस-भाजपाने बजावला व्हीप
संसदेच्या या अधिवेशनाच्या अनुषंगाने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेतील सर्व खासदारांना थ्री लायनर व्हीप जारी केला आहे. त्यानुसार सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी भाजपच्या राज्यसभेतील सर्व खासदारांना संसदेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. तर काँग्रेस पक्षानेही आपल्या लोकसभेतील खासदारांना थ्री लायनर व्हीप बजावला आहे.
दरम्यान अधिवेशन सुरु होण्या आधी सोमवारी काँग्रेस पक्षाने सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. महागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष सरकारला घेरण्याचा तयारीत आहे. पण या सर्वपक्षीय बैठकीकडे तृणमूल काँग्रेस पक्षाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.