पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला दिलेला जनतेचा हा आशीर्वाद!

उत्तर प्रदेशच्या यशाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे उद्गार

भाजपाचे प्रचंड बहुमताचे सरकार बनत आहे. या चार राज्यांत मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान मोदींच्या सुशासनाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदींचे, राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री यांचे आभार व्यक्त करतो, अशा शब्दांत उत्तर प्रदेशच्या यशानंतर आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी आनंद व्यक्त केला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने २७२ जागा जिंकल्यानंतर त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी लखनौमध्ये आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ बोलत होते. त्यावेळी भगव्या रंगाचे वातावरण तिथे निर्माण करण्यात आले होते. योगींच्या कपाळावर भगवा रंग लावून त्यांचे स्वागत व अभिनंदन केले गेले. त्यांच्यासोबत असलेल्या उत्तर प्रदेशचे भाजपा नेतेही भगव्या रंगात न्हाऊन गेले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार राज्यात सरकार आले आहे. सगळ्यात मोठे राज्य उत्तर प्रदेश आहे. म्हणून उत्तर प्रदेशात विशेष करून सगळ्यांच्या नजरा खिळून होत्या. भाजपा व सहकारी पक्ष निषाद राज पार्टी, उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आलो आहोत. यासाठी उत्तर प्रदेशच्या जनतेचे हृदयापासून आभार. कोटी कोटी कार्यकर्त्यांचे अभिनंदन ज्यांचे परिश्रमामुळे भाजपाला सहयोगी पक्षांसोबत सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. बांधवांनो प्रथमच सात टप्प्यात या निवडणुका झाल्या. शांततेच्या मार्गाने झाल्या. त्यासोबतच मतमोजणीबद्दल जे अपप्रचार केले जात होते. पण जनतेने ते सगळे दावे फेटाळून लावले.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या ‘या’ कृतीमुळे उत्तर कोरियाला आला राग

निवडणूक निकालाच्या दिवशीही ‘कश्मीर फाइल्स’ ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

झुलनने केली महिला विश्वचषकातील ‘या’ विक्रमाची बरोबरी

मोबाईल रिपेअर करणाऱ्याने मुख्यमंत्री चन्नी यांना केले पराभूत

 

योगी म्हणाले, पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशसाठी वेळ दिला. सुशासनासाठी जे प्रयत्न आहेत त्यात त्यांचे मार्गदर्शन मिळत राहिले आहे. विकास सुशासनचा मॉडेलला जनतेचा आशीर्वाद आहे. याला पुढे न्यायचे आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने पाच वर्षात सलग उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षेचे जे वातावरण तयार केले. विकासकार्याला पुढे नेले. गरीब कल्याणकारी योजनांना प्रभावीपणे पुढे नेले. त्याचे फळ जनतेने दिले आहे. परिवारवादाला तिलांजली दिली आहे. कोरोना काळातही न थांबता, प्रत्येक कार्यकर्ता या विजयाला कारणीभूत आहे. २ कोटी लोकांच्या घरी शौचालय, निवासस्थाने उभारणे, उत्तर प्रदेशात १ कोटी ४३ लाखांपर्यंत वीज, १० कोटी लोकांपर्यंत विमा योजना, १५ कोटी लोकांना संकटकाळात घरापर्यंत अन्नधान्य पोहोचविले गेले त्यामुळे आमच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली आहेत. राष्ट्रवाद, सुरक्षा, विकास सुशासनच्या मुद्द्यावर भाजपाला बहुमत दिले आहे. त्याचा मान राखायला हवा.

Exit mobile version