मुख्यमंत्री आता शरद पवारांनाही सांगणार का?

मुख्यमंत्री आता शरद पवारांनाही सांगणार का?

“माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नात प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी होऊ नये याचे भान महाडिक यांनी राखलं पाहिजे होतं. या लग्नाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना समजावणार का?” असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माध्यमांसमोर येऊन जनतेला आवाहन करून गेले की, लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करू नका. शिवाय त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याचे लग्नाचा ठरलेला कार्यक्रम रद्द केल्याबद्दल अभिनंदनही केले होते. परंतु मुख्यमंत्री जनतेला उपदेश देत असताना, त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मात्र लग्न समारंभात होते. किरीट सोमय्या यांनी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेची आज भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी हा सवाल केला. “मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार अशी मोहीम सुरू केलीय. त्याची घोषणाही त्यांनी केली. ते कोविड योद्धांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारावर टीका करत असतील तर मी बेजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे.” अशी टीका त्यांनी केली.

हे ही वाचा:

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा”- अतुल भातखळकर

“राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ‘फोन आणि व्हॉट्सऍप्प टॅपिंग’ होत आहेत. हे त्यांनीच ट्विट करून सांगितलं आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी माझी मागणी आहे.” असेही ते म्हणाले.

Exit mobile version