काँग्रेसने पंजाबमधील वादावर ‘तोडगा’ म्हणून अखेर पक्षश्रेष्ठींना पंजाब प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची निवड केली आहे खरी, पण त्यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात वाद पेटणार असल्याची चिन्हे आहेत. सिंग विरुद्ध नवज्योतसिंह सिद्धू हा वाद गेले अनेक दिवस सुरु आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील राजकीय संतुलन राखण्यासाठी प्रदेशाध्यक्षांसोबत ४ कार्याध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली आहे. आता या निर्णयानंतर तरी पंजाब काँग्रेसमधील कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील अंतर्गत संघर्षाचे काय होणार हे पाहावे लागेल.
पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी होत आहे. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला आहे. हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.
हे ही वाचा:
शेर बहादुर देउबांवर नेपाळला ‘विश्वास’
येत्या २४-३६ तासांत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा
उघड्या गटारात पडून ४ वर्षांचा मुलगा बेपत्ता
ठाण्यात भिंत कोसळून दहा गाड्यांचे नुकसान
पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे हायकमांडने या २५ आमदार आणि मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं होतं. या सर्व आमदारांशी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या पॅनलने चर्चा केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील झाखड, मंत्री चरणजीत चन्नी, सुखजिंदर सिंह रंधवा आदींचा या बंडखोरांमध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला.