राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असून या प्रकरणाचा निकाल ३१ जानेवारीपर्यंत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाकडून विधासनभा अध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट निर्माण झाले होते. अजित पवार गटातील आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत तर शरद पवार गट विरोधी बाकावर बसला आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानुसार राष्ट्रवादीच्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे.दरम्यान, जयंत पाटलांनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
हे ही वाचा:
राज्यात २ लाख ७६ हजार कोटींची गुंतवणूक
नोकरी-जमीन घोटाळा प्रकरणी लालू यादव चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल!
येत्या आठवड्यात देशात CAA लागू होईल, ही माझी गॅरंटी!
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवास्थानी ईडीचे पथक दाखल!
दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले होते.मात्र, मुदत संपण्याच्या दोन दिवस अगोदर विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ मागितला.परंतु, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना तीन आठवड्यांऐवजी दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली असून १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल द्यावा, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली.