टेस्लाचे सीईओ मस्क यांना कॅबिनेट पद किंवा सल्लागार पद मिळणार?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

टेस्लाचे सीईओ मस्क यांना कॅबिनेट पद किंवा सल्लागार पद मिळणार?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि रिपब्लकिन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. त्यांनी जाहीर केले आहे की, जर ते या नोव्हेंबरमध्ये निवडणुकीत यश मिळवून राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार हे पद देऊ शकतात. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या जागतिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आले होते की, मस्क यांना ते सल्लागार किंवा कॅबिनेट पदासाठी विचारात घेतील का? यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर दिले की, ते तसे करण्यास तयार आहेत, जर ते (मस्क) यासाठी तयार असतील तर. मस्क हे एक अतिशय हुशार माणूस आहेत. त्यामुळे त्यांना पद देण्याचे काम नक्कीच करेन, जर त्यांनी हे मान्य केले तर नक्कीच दिले जाईल,” असंही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत जाहीर केले आहे की, जर ते या नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष झाले तर ते टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागार पद देऊ शकतात. एलन मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेतली होती. याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मस्क यांच्या कारचे कौतुक केलं होतं आणि ते उत्कृष्ट प्रोडक्ट बनवतात असं म्हटलं होतं.

‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, मस्क यांनी यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले होते. मात्र, यावेळी ते डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देत आहेत. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. “मी ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि ते लवकरात लवकर बरे होण्याची आशा करतो,” असं म्हटलं होतं.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात भूकंपाचे धक्के

पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर

सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !

दरम्यान, याचं मुलाखतीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर ते निवडणूक जिंकले तर ते इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी ७,५०० डॉलर्स टॅक्स क्रेडिट काढून टाकण्याचा विचार करतील. टॅक्स क्रेडिट्स आणि टॅक्स इन्सेंटिव्ह ही चांगली कल्पना नाही, असं ते म्हणाले.

Exit mobile version