सुप्रिया सुळे अनिल देशमुखांच्या भेटीला?

सुप्रिया सुळे अनिल देशमुखांच्या भेटीला?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी आज संपणार आहे. अनिल देशमुख यांना आज जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या आज न्यायालयात अनिल देशमुखांच्या सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपल्यानंतर पीएमएलए सत्र न्यायालयाने देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, ईडीने देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले होते. हायकोर्टाने अनिल देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती.

हे ही वाचा:

खासगी चालकांकडून शिवनेरी बस सेवा सुरू; संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांचा आरोप

उपरती झाली; स्वा. सावरकर यांचे नाव संमेलन गीतात समाविष्ट

नवाब मलिक यांनी केले ईडीचे स्वागत

न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम घोषित, कोण आहे नवीन कर्णधार?

दरम्यान अनिल देशमुख यांना न्यायलयात हजर करण्यापूर्वी त्यांना जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सेशन कोर्टात हजर केले असून सखल चौकशीसाठी गरज आहे म्हणून ईडीने तीन दिवसांची कोठडी मागितली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

Exit mobile version