24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरराजकारण“गडचिरोली-चिमूरची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार”

“गडचिरोली-चिमूरची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मोठे विधान

Google News Follow

Related

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवर, ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. अशातच यापूर्वी एक्झिट पोलचा कल समोर आला होता. एक्झिट पोलने देशपातळीवर एनडीएला कौल दिला असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जवळपास बरोबरीची लढाई असल्याचे चित्र दाखवले होते. यादरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ‘लोकसत्ता’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

“महाराष्ट्र राज्यासह देशभर भाजपविरोधी वातावरण असताना ‘एक्झिट पोल’चे आकडे म्हणजे ‘दाल में कुछ काला है,’ असे असून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राची जागा हरल्यास राजकीय संन्यास घेणार,” अशी घोषणा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, “इंडिया आघाडी विदर्भात १०, तर राज्यात ३५ जागा जिंकेल. प्रचारादरम्यान आम्ही घेतलेल्या सभांना लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. परंतु, सत्ताधाऱ्यांना आनंदी करण्यासाठी ‘एक्झिट पोल’चे आकडे भाजपच्या समर्थनार्थ दिले गेले. मतमोजणीस उशीर झाला तरी चालेल, मात्र ‘सी-१७ फॉर्म’ आणि मशिनबरोबरच लावून येणाऱ्या फॉर्मची आकडेवारी जुळल्याशिवाय एव्हीएम मशिन उघडली जाऊ नये,” अशी सूचना केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

हे ही वाचा:

लोकसभा २०२४: मुंबईतून पीयूष गोयल, राहुल शेवाळे आघाडीवर

क्रिकेट खेळताना तरुण मैदानावरच कोसळला!

कोल्हापुरात भरधाव कारने सहा जणांना उडवले! तिघे मृत

शैक्षणिक नैराश्यातून मुंबईतील ‘आयएएस’ दाम्पत्याच्या मुलीने केली आत्महत्या

गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील निवडणूक ही लोकांनीच हातात घेतली होती. लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध प्रचंड राग होता. असे असतानाही ‘एक्झिट पोल’ भाजपच्या बाजूने कौल दाखवत असेल, तर ‘दाल में कुछ काला है’, असे समजण्यास वाव आहे आणि ही निवडणूक काँग्रेस पक्ष हरला तर राजकीय संन्यास घेऊ, असं मोठं वक्तव्य त्यांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा