देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही

आमदार अतुल भातखळकर यांचा इशारा, कांदिवली पूर्वला 'सामना' ची केली होळी

देवेंद्र फडणवीसांबद्दल खालच्या पातळीतील भाषा सहन करणार नाही

मेट्रो पासून एसआरए पर्यंतची अनेक विकास कामे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावली. त्यांच्याबद्दल बोलण्यासारखे काही नसल्याने ‘सामना’त त्यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेचा वापर करण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी शनिवार, १९ ऑगस्ट रोजी ‘सामना’ वृत्तपत्राची होळी केली.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हा इशारा समजावा. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा भाजपा नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी बोलताना दिला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ‘सामना’ मध्ये खालच्या भाषेचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ आमदार भातखळकर यांच्या नेतृत्वखाली सामना वृत्तपत्राची आज होळी करण्यात आली, यावेळी अतुल भातखळकर बोलत होते. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाची अनेक कामे केली. सामान्य मुंबईकरांना दिलासा दिला. त्यांच्याबाबत अशा खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर आम्ही सहन करणार नाही.

हे ही वाचा:

रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’

मोदी सरकारच्या कार्यकाळात बँकिंग क्षेत्रात सुधारणा

‘फलाटावरील प्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली नसती तर तो वाचला असता!’

म्यानमारमध्ये पळालेले २१२ भारतीय परतले भारतीय लष्करामुळे मायदेशी

मुंबई महापालिकेच्या २३६ जागांसाठी तेच सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. हिंमत असेल तर सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घ्या मग ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होईल, असेही आमदार भातखळकर म्हणाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी संजय राऊत यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

Exit mobile version