नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन रद्द होणार?

ईडीची न्यायालयात धाव

नवाब मलिकांचा वैद्यकीय जामीन रद्द होणार?

जामिनावर बाहेर असलेले नवाब मलिक हे विधानसभा निवडणूक लढवत असून यावरून मोठा वाद उभा राहिला आहे. नवाब मलिक यांनी महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याला भाजपाचा विरोध आहे. तरीही हा विरोध झुगारुन विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नवाब मलिक उतरले आहेत. मात्र, आता नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी आता ईडीने न्यायालयात धाव घेतली आहे.

नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मलिक अनेक महिने तुरुंगात होते. गेल्यावर्षी जून महिन्यात वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, नवाब मलिक यांचा नियमित जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, अशी याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. वैद्यकीय जामीन देताना मलिकांवर कोर्टानं लादलेल्या अटीशर्तींचंही उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. नवाब मलिक हे वैद्यकीय कारणासाठी दिलेल्या जामिनाचा गैरवापर करत आहेत. नवाब मलिक हे सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून जोरदार प्रचार करत आहेत. ते अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. हा वैद्यकीय जामिनाचा गैरवापर आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या नियमित जामिनाची विनंती फेटाळण्यात यावी, अशी मागणी सॅमसन पाथरे यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ‘विराट’ दर्शन; चक्क हिंदी आणि पंजाबीत

ट्रम्प यांचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्ज भारतासाठी ठरणार फायद्याचे!

शाहरुख खानला धमकावल्या प्रकरणी फैजान खानला अटक

बांगलादेशी मुलींना हिंदू नावाने आधारकार्ड, ईडीची झारखंड, प. बंगालमध्ये छापे

एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग धरला असून दुसरीकडे नवाब मलिक यांचा जामीन रद्द करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नवाब मलिक हे मुंबईतील शिवाजीनगर- मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी भाजपा आग्रही होता. मात्र, या विरोधाला झुगारुन अजित पवारांनी शेवटच्या क्षणी नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देऊ केला होता. नवाब मलिक यांचा प्रचार आम्ही करणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतली आहे.

Exit mobile version