“महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार काय? छत्तीसगडच्या जशपूरमध्ये लखीमपूरची पुनरावृत्ती, कार चालकाने २० जणांना चिरडले, दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यानची घटना, अपघातात ४ जणांचा मृत्यू, २० जण जखमी.” असं ट्विट करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
छत्तीसगढच्या जशपूरमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली जात असताना मध्य प्रदेशकडे जाणारे वाहन अचानक पठलगाव येथे जमावाला धडकले. एएनआय वृत्तसंस्थेने पोलिस अधीक्षक (एसपी) विजय अग्रवाल यांच्या हवाल्याने सांगितले, “एकाचा मृत्यू झाला, दोन गंभीर जखमी झाले, तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.”
MVA पुन्हा बंदची हाक देणार काय? छत्तीसगडच्या जयपूरमध्ये लखीमपूरची पुनरावृत्ती, कार चालकाने 20 जणांना चिरडले, दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यानची घटना, अपघातात 4 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी pic.twitter.com/F0l8QK0RSH
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 15, 2021
या घटनेतील पोलीस कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना एसपी यांनी सांगितले की, दोन पोलीस-पाथळगाव स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) यांना निलंबित करण्यात आले आहे.
एसयूव्हीमधील दोन प्रवाशांना, बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू यांना अटक करण्यात आली आहे आणि पोलिसांनी सांगितले की त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ (खून) आणि ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.
हे ही वाचा:
नवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर
पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!
‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’
विश्वकर्मा आणि साहू दोघेही मध्य प्रदेशातील सिंगरौलीचे रहिवासी आहेत. ते छत्तीसगडमधून जात होते आणि घटना घडली तेव्हा शेजारच्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. असे पोलिसांनी सांगितले.