28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करेल?

‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करेल?

ऑगस्टमधील सर्वेक्षण काय सांगते…

Google News Follow

Related

देशात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. मात्र खरोखरच लोकांना बदल हवा आहे का, लोकांची सरकार बदलण्याची मानसिकता आहे का, यावर सर्वेक्षण घेण्यात आले असता वेगळीच माहिती हाती आली आहे.

‘इंडिया टुडे-सी व्होटर मूड ऑफ द नेशन’च्या सर्वेक्षणातील बहुतांश प्रतिसादकर्त्यांनुसार, विरोधी आघाडी ‘इंडिया’ भारतीय जनता पक्षाचा पराभव करू शकणार नाही. ५४ टक्के प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की, ‘इंडिया’ गट भाजपला पराभूत करू शकणार नाही, तर ३३ टक्के लोकांनी ‘इंडिया’ भाजपला पराभूत करू शकेल, असे म्हटले आहे. अन्य प्रतिसादकर्ते मात्र कोणताही निर्णय घेऊ शकले नाहीत.

सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील काँग्रेससह अन्य काही प्रमुख पक्षांसह छोट्या पक्षांनी ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. कर्नाटकातील बेंगळूरूमध्ये या आघाडीची एक महिन्यापूर्वीच घोषणा करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पराभूत करण्याचे लक्ष्य त्यांनी समोर ठेवले आहे. नाव बदलल्याने ‘इंडिया’ आघाडीला मते मिळतील का, असे विचारले असता, ३९ टक्के प्रतिसादकांनी होकारार्थी उत्तर दिले तर ३० टक्के लोकांनी यावर असहमती दर्शवली.

तसेच, १८ टक्के लोकांनी ‘इंडिया’ हे नवीन नाव मत मिळवणार नाही किंवा ते आकर्षक नाव नाही, असेही नमूद केले. नावे बदलल्याने निवडणुकीवर काय परिणाम होईल, यावर उर्वरित लोकांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी कोण योग्य आहे, अशी विचारणा केली असता, २४ टक्के लोकांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव घेतले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे दिल्लीचे समकक्ष अरविंद केजरीवाल यांना प्रत्येकी १५ टक्के लोकांनी पसंती दिली.

हे ही वाचा:

शरद पवार, सुप्रिया सुळे लवकरच मोदी सरकारला पाठिंबा देतील

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; २० मिनिटांसाठी होते तुरुंगात

… म्हणून जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवले

शरद पवार म्हणतात, अजित पवार आमचेचं

सर्वेक्षणानुसार, जानेवारीपासून जनतेचा कौल राहुल गांधी यांच्या बाजूने गेला आहे. त्यावेळी केल्या गेलेल्या सर्वेक्षणात केवळ १३ टक्के लोकांनी विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली होती. तेव्हा अरविंद केजरीवाल यांना २७ टक्के पसंती मिळाली होती. मात्र आता त्यांची लोकप्रियता कमालीची घसरली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा