ठाकरे सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांच्या कडून राज्याचे गृहमंत्री पद काढून घेतले जण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या जागी जयंत पाटिल यांची वर्णी लागणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यु यामुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे याला देखील एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई शहराच्या पोलिस आयुक्तांची देखील बदली करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली.
हे ही वाचा:
पवारांनी घेतली वाझे प्रकरणाची माहिती
ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आक्रमक
मात्र या सर्व प्रकरणात गृह खात्यावर देखील जोरदार टीका झाली. त्यामुळे आता सचिन वाझे याच्या प्रकरणात अनिल देशमुख यांची गृहमंत्री पदाची खुर्ची देखील जाते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातबरोबरच शहद पवार देखील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
अनिल देशमुख आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट झाली. मात्र या भेटीत नागपूरातील मिहान प्रकल्पाविषयी चर्चा झाली आणि शरद पवारांनी थोडक्यात सचिन वाझे प्रकरणाची माहिती घेतली असे अनिल देशमुख यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गृहमंत्र्यांकडून राजीनाम्याचा प्रश्नच नाही
याबाबत खुद्द जयंत पाटील यांनी मात्र हे सर्व फेटाळून लावले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चांगलं काम करत असून त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे जयंत पाटील म्हणाले. बाहेर याबाबत कितीहा वावड्या उठल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असा कुठलाही विचार नसल्याचे त्यांना स्पष्ट केले आहे.