पंजाबच्या राजकारणाला मिळणार नवी ‘फिरकी’?

पंजाबच्या राजकारणाला मिळणार नवी ‘फिरकी’?

राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध काही नवा नाही. क्रिकेटमधील आपली कारकीर्द संपल्यानंतर राजकारणात नशीब आजमावणारे अनेक खेळाडू या देशाने पाहिले आहेत. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू कीर्ती आझाद, गौतम गंभीर, मनोज तिवारी, अशोक दिंडा अशी अनेक नावे घेता येतील. याच यादीत आता हरभजन सिंग याचे देखील नाव समाविष्ट होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

भारताचा स्टार फिरकीपटू राहिलेला हरभजन सिंग याने शुक्रवारी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाही केली. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हरभजन आता राजकारणात आपली नवी इनींग सुरू करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. पंजाब विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना या चर्चांना वेग आला आहे. काही दिवसांपासूनच हरभजनच्या राजकीय प्रवेशाची कूजबूज सुरू असलेली पाहायला मिळत होती. त्यातच आता हरभजनच्या निवृत्तीच्या घोषणेने या चर्चा वाढलेल्या दिसत आहेत.

हे ही वाचा:

हरभजन सिंगचे क्रिकेटला अलविदा

तुकाराम सुपेंच्या घरातील घबाड संपेना; ३३ लाख जप्त

‘समाजवादी अत्तर’ बनवणाऱ्या उद्योजकांवर आयकर विभागाची धाड! सापडले १५० कोटी रुपये

अतुल राणे यांची ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती 

यामागे कारणही तशाच प्रकारचे आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाचे नेते आणि सध्याचे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी हरभजन सिंग याची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो सिद्धू यांनी समाज माध्यमांवर प्रसिद्ध केला होता. तेव्हापासूनच ही भेट आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने असल्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवण्यात येत होती.

हरभजन याने २०१६ साली भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो आयपीएल सामने खेळताना दिसला. तर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये समालोचकाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. आता पाच वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर राहिल्यानंतर हरभजनने वयाच्या ४१ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे.

Exit mobile version