राज्यात सध्या कोविडने हाहाकार माजवला आहे. राज्याची संपूर्ण आरोग्ययंत्रणा केवळ याच एका आजाराचा सामना करत असल्याने इतर आजारांकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे इतर आजारांच्या रुग्णांचे फार हाल होऊ लागले आहेत. विशेषतः मोतीबिंदू झालेल्या अनेक रुग्णांवर अंधत्वाची तलवार लटकत आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राज्यात कोविडचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे इतर अनेक आजारांकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक नेत्रतज्ज्ञांना कोविडच्या कामास लावल्यामुळे राज्यातील मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया जवळजवळ बंद पडल्या आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांचा मोतिबिंदू पिकला आहे, त्यांच्यावर संपूर्ण अंधत्वाची तलवार लटकत आहे. हा मोतिबिंदू शस्त्रक्रिया करून तातडीने काढून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे, मात्र ठाकरे सरकारची यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसता आहे. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे.
हे ही वाचा:
वैमानिक दीपक साठे यांची नुकसानभरपाई ठाकरे सरकारने अडवली
बाबा रामदेव यांच्या बिनबुडाच्या विधानांवरून आयएमएचा संताप
देशाला कोविड पाठोपाठ काळ्या बुरशीची चिंता
अजित दादा, उद्धव ठाकरेंना सल्ला द्या
अतुल भातखळकर यांनी ट्वीटरच्या मार्फत सरकारवर निशाणा साधला आहे. लोकांच्या डोळ्यासमोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहेत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,
करोना महामारीत इतर आजारांकडेही ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलेय. सरकारी रुग्णालयांतल्या मोतिबिंदूच्या हजारो शस्त्रक्रिया बंद आहेत. गरिबांच्या गरजांकडे दयाभावनेने पाहणारी सरकारची नजरच मेलीय. लोकांच्या डोळ्या समोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहे का?
करोना महामारीत इतर आजारांकडेही ठाकरे सरकारने दुर्लक्ष केलेय. सरकारी रुग्णालयांतल्या मोतिबिंदूच्या हजारो शस्त्रक्रिया बंद आहेत. गरिबांच्या गरजांकडे दयाभावनेने पाहणारी सरकारची नजरच मेलीय. लोकांच्या डोळ्या समोर अंधार झाल्यानंतरच ठाकरे सरकारचे डोळे उघडणार आहे का? #mahavasooliaaghadi pic.twitter.com/4d52fzgHO2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 22, 2021