सचिन वाझेच्या चौकशीतून पुढे येणार ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे नाव?

सचिन वाझेच्या चौकशीतून पुढे येणार ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याचे नाव?

अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझे याने चौकशीत आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आणखी एका मंत्र्याचे नाव पुढे येण्याची शक्यता बळावली आहे.

एनआयएने केलेल्या चौकशीत सचिन वाझेने ही माहिती उघड केली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी सचिन वाझेने एनआयएकडे गृहमंत्र्यांनी बोलावून १०० कोटींच्या खंडणीचे टार्गेट दिले असल्याचे देखील सांगितले. त्याबरोबरच सचिन वाझेने आणखी एका मंत्र्याने वसूलीचे टार्गेट दिले होते असे सांगितले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचे नाव पुढे आलेले असतानाच आता हा दुसरा नेता कोण? अशी चर्चा सुरू झाली आहे. या मंत्र्याने मागील वर्षी हे टार्गेट दिले होते असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

अमित शहांकडे आहेत आणखी काही लेटर बॉम्ब

“आपण दाबलेला रिपोर्ट फडणवीसांनी बाहेर कसा काढला यावर मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांची चर्चा”

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे मोठीच खळबळ उडाली होती. गृहमंत्र्यावरील या आरोपांमुळे ठाकरे सरकारची प्रतिमा आधीच मलिन झालेली असतानाच आता हा दुसरा मंत्री कोण? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कालच पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी एका मंत्र्याचे टार्गेट १०० कोटी तर इतर मंत्र्यांचे किती? असा प्रश्न उपस्थित केला होता. या मंत्र्याचे नाव चौकशीत पुढे उघड होईलच. यानंतर ठाकरे सरकार नेमकी काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Exit mobile version