25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणकमल नाथ, नकुल नाथ भाजपात जाणार?

कमल नाथ, नकुल नाथ भाजपात जाणार?

चर्चेला उधाण, काँग्रेसकडून इन्कार

Google News Follow

Related

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि त्यांचे पुत्र नकुल नाथ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांनी शनिवारचा दिवस गाजला. अर्थात, या दोघांकडून याविषयी शिक्कामोर्तब केलेले नसले तरी त्याची चर्चा मात्र रंगली आहे. काँग्रेसने असे काही पाऊल कमल नाथ उचलतील अशी शक्यता नसल्याचे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाने मात्र कमल नाथ जर भाजपामध्ये येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे म्हटले आहे. मध्य प्रदेशचे भाजपा प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा म्हणतात की, जर कमल नाथ भाजपात येत असतील तर त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले आहेत. आमच्या विचारधारेविषयी आणि नेतृत्वाविषयी जर कुणाला विश्वास असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा असेल तर त्यांचे स्वागत केले जाईल.

कमल नाथ आणि नकुल नाथ हे भाजपात येत आहेत का, यावर शर्मा म्हणाले की, सद्यपरिस्थितीत आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कारण प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास काँग्रेसने जो नकार दिला त्यामुळे काँग्रेसमधील अनेकांना दुःख झालेले आहे. पण काँग्रेसने त्यांच्या भावनांचा अनादर केला. जर हे दुःख त्यांच्या मनात आहे तर त्यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडे असतील. मग ते कमल नाथ, नकुल नाथ असोत की आणखी कुणी?

हे ही वाचा:

जनशताब्दीतील आसनांनी प्रवाशांची ‘पाठ’ धरली

युक्रेनचे अवदिवका शहर रशियाच्या ताब्यात

शंभू बॉर्डरवर तैनात असलेल्या सब इन्स्पेक्टरचा मृत्यू

ससूनमधून फरार झालेल्या कैद्याला अटक; ललित पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती

तीन आठवड्यांपासून कमल नाथ यांच्या अस्वस्थतेविषयीची चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्यानंतर ही अस्वस्थता वाढली. प्रमोद कृष्णम भाजपात जातील असा अंदाज व्यक्त केला गेल्यावर कमल नाथ म्हणाले होते की, प्रत्येक जण स्वतंत्र आहे. कुणीही एका पक्षाशी बांधलेला नाही. त्यातच कमल नाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून आपण लोकसभा लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले. अद्याप काँग्रेसकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कमल नाथ यांनीही त्याला दुजोरा दिला आणि ते म्हणाले की, काँग्रेस लोकसभेसाठी तयारी करत आहे आणि काँग्रेस पक्षाकडून लोकसभेचे उमेदवार जाहीर होतील तेव्हा छिंदवाडातून नकुल नाथ हेच उमेदवार असतील.
काँग्रेसने मात्र याचा इन्कार केला. गेली ४५ वर्षे ते काँग्रेससोबत आहेत. पक्ष सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नसेल. उलट आपल्या पक्षातील वादविवादांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा बातम्या भाजपाकडून पसरवल्या जात आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा