भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार का? काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

सरकार टिकेल हे तुम्हाला का सांगावं लागतं? असं सांगावं लागतं तेव्हा काही तरी गडबड आहे. हे समजून जायचं असतं. आजारी नसलेल्या माणसाला तो आजारी नाही हे सांगावं लागत नाही. तो ठणठणीत असल्याचं दिसून येतं. असं सांगतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तब्येत बिघडली हे माहीत आहे. परंतु सरकारचं मला माहीत नाही, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार पाच वर्षे टिकेल असं म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असं चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. तेव्हा, सरकार टिकेल हे का सांगावं लागतं? सरकार टिकेल हे सांगावं लागतं याचा अर्थ काही तरी गडबड आहे. माझी तब्येत बरी आहे, ती बरीच असते. ते सांगावं लागत नाही. ज्यावेली तब्येत बरी नसते तेव्हा तुमच्या लक्षात येतं. तेव्हा तब्येत बरी नाही हे सांगावं लागतं, असं सांगतानाच पवारांची तब्येत बिघडली आहे. सरकारचं मला माहीत नाही, असं चंद्रकांतदादा म्हणाले.

हे ही वाचा:

तृणमुलच्या गुंडांचे क्रौर्य, ८५ वर्षांच्या वृद्धेलाही मारले

पोटदुखीमुळे शरद पवार रुग्णालयात

भाजपा सर्वच्या सर्व तीस जागा जिंकेल

बंगालमध्ये ममतांच्या ‘भद्रलोक’चा कहर

भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा सवाल यावेळी त्यांना करण्यात आला. भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे अंदाज कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत. तुमच्याकडूनही हेच अंदाज समजत आहेत. परंतु जेव्हा ठरेल तेव्हा तुम्हाला कळेल. असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे.

Exit mobile version