25 C
Mumbai
Friday, December 20, 2024
घरराजकारणगोव्यात चालणार फडणवीसांची जादू?

गोव्यात चालणार फडणवीसांची जादू?

Google News Follow

Related

महाराष्ट्र आणि गोवा ही दोन राज्य म्हणजे एकमेकांचे शेजारी. या दोन्ही राज्यांमध्ये भाषा आणि संस्कृती यांचे फार मोठे साम्य आहे. मूळचे गोव्याचे असलेले अनेक लोक महाराष्ट्र स्थायिक आहेत. ज्यांचे मूळ गाव, कुलदैवत हे गोव्यात आहे. पण आता गोवा येथे पार पडत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही महाराष्ट्र आणि गोव्याचे नाते जुळले आहे.

गोव्यात आत ४० विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडत आहे. गोव्यात सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार असून पुन्हा पाच वर्ष गोव्याची सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाने रणनिती आखली आहे आणि ही मोहीम फत्ते करण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपाने सोपवली आहे. देवेंद्र फडणवीस हे गोव्यातील भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रभारी म्हणून काम करत आहेत.

हे ही वाचा:

उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?

गोवेकरांची पसंती कोणाला असणार?

धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक

उत्तराखंड, गोव्यासाठी मतदार देणार कौल! उत्तर प्रदेशमध्येही होणार मतदान

यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिहार मधील निवडणुकीची जबाबदारी भाजपाने सोपवली होती. त्यांनी हि जबाबदारी अतिशय प्रभावीपणे पार पाडली आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा आणि जनता दल युतीचे सरकार आले. अशाच प्रकारची कामगिरी पुन्हा एकदा गोव्यात करून दाखवण्याचे आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. त्यांच्यातील क्षमता लक्षात घेऊनच भाजपाने त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.

भाजपाने गोव्यात मिशन २२+ चा नारा दिला आहे. पण भाजपाच्या या या ध्येयात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, काँग्रेस या पक्षांचा अडसर आहे. तर भाजपामधील बंडखोरांचाही अडसर या वाटचालीत आहे. भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे भाजपाची ही मिशन गोवा मोहीम म्हणावी तेवढी सोपी नाही. पण देवेंद्र फडणवीस यांचा आजपर्यंतचा इतिहास बघता ते यात यशस्वी होतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा