महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्राद्वारे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीच्या लवकरच होऊ घातलेल्या बैठकीत अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपद काढून घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार लवकरच होऊ घातलेल्या कॅबिनेट बैठकीत हे बदल घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची या आठवड्याच्या शेवटी भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वृत्तानुसारच, सध्या अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याच्या शरद पवार यांच्या भूमिकेशी काँग्रेस आणि शिवसेना सहमत आहे. मात्र अनिल देशमुख यांचे मंत्रीपद डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न असल्याचे देखील बोलले जात आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमल नाथ यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली होती.
हे ही वाचा:
पवार साहेब सांगतील ते ब्रह्मवाक्य
सचिन वाझेची ‘ती’ डायरी एनआयएच्या हाती
‘ए भाई, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय’; अमृता फडणवीसांनी झापले
अनिल देशमुख यांच्याबदल्यात दिलीप वळसे-पाटील आणि जयंत पाटील यांची नावे शर्यतीत आहेत. काँग्रेस देखील रिक्त असलेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदी आपल्या एखाद्या नेत्याची वर्णी लावून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना एखादे मंत्री पद दिले जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाकडून सातत्याने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.