युवासेना कोषाध्यक्ष “अमेय घोले” यांची युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती असल्यामुळे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे .या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. अनेक नगरसेवक, खासदार, आमदार आणि त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. आता असंच एक मोठं नाव शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अमेय घोले युवासेनेच्या व्हाट्सअँप परिवारातून बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेय घोले हे ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा आहेत.
कोण आहेत अमेय घोले
युवासेना कोषध्यक्ष अमेय घोले यांनी युवासेना कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. घोले आदित्य ठाकरेंवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अनेक दिवसांपासून अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींवर नाराज आहे . एवढंच नाहीतर त्यांनी ही नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलूनही दाखवल्याचं कळतंय. पण तरीदेखील याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे घोले नाराज असल्याचं बोललं जात आहे.
हे ही वाचा:
‘वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे’
छत्रपतींच्या वारसांकडून जनतेचा अपेक्षाभंग
‘ओएलएक्स’ वरून जुन्या वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने लुटत होते चौघे
अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्येदेखील घोले यांचा समावेश आहे. सध्या घोले नाराज असून ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे यावेळीही या फक्त अफवा ठरणार की, खरंच अमेय घोले यंदा शिंदे गटात जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.