ज्यांनी आयुष्यात गाडी चालविली नाही, त्यांच्या हाती व्होल्वो गाडी सोपविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. या गाडीचे कंडक्टर अजित पवार आहेत तर काँग्रेस हे प्रवासी आहेत, असे वक्तव्य ठाकरे सरकारमधील पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
पंढरपुरातील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव यांनी तीन पक्षांच्या या सरकारला व्होल्वो गाडीची उपमा दिली. हे सरकार स्थापन झाले तेव्हा त्याला रिक्षाची उपमा देण्यात आली होती. गुलाबराव पाटील म्हणाले की, सरकाररूपी गाडी चालविण्यासाठी लायसन्स लागतं, पात्रतेसाठी प्रमाणपत्र लागतं पण शरद पवार यांनी बिना लायसन्सचा ड्रायव्हर देत त्याच्या हाती व्होल्वो गाडी सोपविली आहे.
हे ही वाचा:
अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी
ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत
दसऱ्याच्या दिवशी इन्कम टॅक्सने ‘सोने’ लुटले
सरकारला आली जाग! रेल्वे प्रवाशांसाठी ‘तिकीट खिडकी’ उघडणार?
ते म्हणाले की, “मला माहिती आहे, गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागतं. कुठलंही काम करायचं असेल तर पात्रतेसाठी तुम्हाला प्रमाणपत्र लागतं. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असं काही चालू केलं की बिना लायसन्सचा ड्रायव्हर बसवून दिला. उद्धव ठाकरे ड्रायव्हर, अजित पवार कंडक्टर आणि बाळासाहेब थोरात प्रवासी झाले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की हा ड्रायव्हर अपघात करेल. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट व्होल्वो गाडी देण्यात आली. पण दोन वर्षामध्ये तीन लोकांची गाडी सुस्साट चालत आहे.