हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

भारताचा माजी क्रिकेटपटू, वीरेंद्र सेहवागने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतातील अनेक भागात फटाके फोडण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्विट करून विचारले की, “देशात फटाक्यांवर पूर्ण बंदी असताना ते अचानक आले कुठून?” त्याने ट्विटमध्ये लिहिले की,”कदाचित हे क्रिकेटचा विजय साजरा करत आहेत. पण मग दिवाळीत फटाके फोडण्यात गैर काय? हे ढोंग का? सगळं ज्ञान तेंव्हाच का आठवतं?” दिवाळीत फटाके बंदीची मागणी करणाऱ्यांवर त्यांनी खरपूस हल्ला चढवला आहे.

पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या विजयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात काही लोकं पाकिस्तानच्या विजयासाठी भारतात जल्लोष करताना दिसत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही असे काही व्हिडिओ दिसत आहेत, ज्यात लोकं फटाके लावून साजरे करताना दिसत आहेत.

सेहवागने ट्विटमध्ये लिहिले की, “जेव्हा भारतात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी आहे, तेव्हा हे फटाके अचानक आले कुठून? दिवाळी दरम्यान फटाक्यांवर बंदी आहे, पण भारताच्या काही भागात पाकिस्तानचा विजय साजरा करण्यासाठी फटाके पेटवले गेले. बरं ते क्रिकेटचा विजय साजरा करत असतीलही, पण मग दिवाळीत फटाके फोडण्यात गैर काय? हे ढोंग का? सगळं ज्ञान तेंव्हाच का आठवतं?”

त्याचवेळी, भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनीही पाकिस्तानच्या विजयावर फटाके उडवल्याचा घणाघाती हल्ला केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, “पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडणारे भारतीय असू शकत नाहीत.” आम्ही आमच्या खेळाडूंसोबत उभे आहोत. गंभीरने हॅशटॅगद्वारे हे कृत्य लज्जास्पद असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

पाकिस्तानने पहिला टी-२० सामना दहा गडी राखून जिंकल्यानंतर भारतीय मुस्लिमांसह जगातील सर्व मुस्लिम आनंद साजरा करत आहेत, असे पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी रविवारी सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये इम्रानचे मंत्री रशीद म्हणाले. ‘मला खेद आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो मी माझ्या जबाबदाऱ्यांमुळे मैदानावर पाहू शकलो नाही. पाकिस्तानच्या संघाचे, पाकिस्तानचे अभिनंदन, आज आमचा अंतिम सामना होता. जगातील मुस्लिमांसह भारतातील मुस्लिमांच्या भावना पाकिस्तानी संघासोबत होत्या. जगातील सर्व मुसलमानांना या विजयाच्या शुभेच्छा.

Exit mobile version