भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली टीका
यवतमाळ आगारात कार्यरत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने लिहिलेला ‘वसूली सरकार’ हा मजकूर बदनामीकारक आहे म्हणून त्याचे निलंबन करण्यात आले आहे की खरं, वास्तव सांगितल्याबद्दल त्याला निलंबनाची शिक्षा देण्यात आली आहे हे सरकारने स्पष्ट करावे, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी या कर्मचाऱ्यावर केलेल्या कारवाईसाठी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
‘महाराष्ट्राच्या महावसुली खंडणीखोर टोळीला अंबानीच्या घराशेजारी स्फोटके ठेवायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सिजन टँकरसाठी मात्र ड्रायव्हर मिळत नाही, हे १०० कोटींचे वसुली सरकार आहे’
असा मेसेज एस टी महामंडळ बस वाहक प्रवीण लढी यांनी केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशावरून ही कारवाई केली गेली आहे, असे बोलले जात आहे. यवतमाळ डेपोतील संचालकांनी तेथील निरीक्षकाद्वारे सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
यवतमाळ डेपोत कार्यरत असलेले प्रवीण लढी यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या खासगी व्हॉट्सअप ग्रुपवर मंत्री आणि सरकारच्या संदर्भात एक पोस्ट केली. त्याविरोधात पोलिसांत आणि एसटी महामंडळात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात साधी तक्रार जाहीर केली तर महामंडळाने मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केली.
हे ही वाचा:
गोंधळी खासदारांना २ वर्षांसाठी निलंबित करा
नव्या शैक्षणिक धोरणाच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींनी हे सांगितलं
खुशखबर!! ओबीसींसाठी इथे असतील २७ टक्के जागा…
करा पुन्हा एकदा स्वस्तात विमानप्रवास
ती चौकशी केल्यावर यवतमाळ डेपोचे निरीक्षक एस.एस. राठोड यांनी या चौकशीचा अहवाल सादर केला. राठोड यांनी आपल्या अहवालात म्हटले होते की, परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात बदनामी करणारी पोस्ट लढी यांनी लिहिली होती. त्याच्या चौकशीलाही त्यांनी सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या काळात लढी यांना रोज सकाळी १० वाजता डेपो प्रमुखांपुढे हजर राहावे लागेल.
लढी यांच्यावरील कारवाईवर खासदार किरीट सोमय्या यांनीही टीका केली आहे.
यवतमाळ आगारात कार्यरत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याने लिहिलेला 'वसूली सरकार' हा मजकूर बदनामीकारक आहे म्हणून त्याचे निलंबन करण्यात आले आहे की खरं, वास्तव सांगितल्याबद्दल त्याला निलंबनाची शिक्षा देण्यात आली आहे हे सरकारने स्पष्ट करावे. pic.twitter.com/NRXHsaxp9N
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 29, 2021