महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेना नेता संजय राठोड अजूनही मोकाट का फिरतोय? कोणाच्या सांगण्यावरून त्याला बेड्या ठोकल्या जात नाहीयेत? असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे. संजय राठोड प्रकारणात सुरुवातीपासूनच आक्रमक असणाऱ्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राठोड प्रकरणावरून ठाकरे सरकारला फटकारले आहे. ट्विटरवर व्हिडिओ संदेश पोस्ट करत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या संजय राठोड वर आणखी एक गंभीर आरोप एका महीलेने केला आहे
मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातोय ?? pic.twitter.com/ff1L5yFeUx— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 13, 2021
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची गोंधळवृत्ती; शिष्यवृत्ती परीक्षा फक्त मुंबईत रद्द
दोन लसी घेतलेल्यांचे ‘तिकीट कापले’
मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग होणार का मोकळा?
फी कपातीच्या विषयात ठाकरे सरकारची पळवाट, अध्यादेश ऐवजी शासकीय आदेश
गुरुवार, १२ ऑगस्ट रोजी शिवसेना नेते संजय राठोड यांच्या विरोधात एका महिलेने केलेले लैंगिक छळाचे आरोप प्रकाश झोतात आले. भाजप नेत्या चित्र वाघ यांनी ट्विटरच्या मध्यमातून या पीडित महिलेचे पत्र समोर आणले. यवतमाळ पोलिसांना लिहिलियेल्या या तक्रारीच्या पत्रात संजय राठोड आपला लैंगिक छळ करत असल्याचे त्या महिलेने म्हटले आहे. पण हे पत्र पाठवले तेव्हा संजय राठोड मंत्री असल्यामुळे त्या पत्राची दखल घेतली गेली नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.
त्यानंतर शुक्रवार, १३ ऑगस्ट रोजी पुहा चित्रा वाघ यांनी राठोड प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. ‘शिवसेना नेता संजय राठोड विरोधात आणखीन एका महिलेने अतिशय गंभीर असे आरोप केले आहेत. ज्याच्या जाचामुळे एका मुलीला आत्महत्या करावी लागली, जीव गमवावा लागला आणि इतके ठोस पुरावे असताना त्याला बेड्या ठोकल्या गेल्या नाहीयेत? त्याला कोण पाठीशी घालत आहे?’ असा सवाल वाघ यांनी केला आहे. राज्यातील महिलांनी अशा पद्धतीची तालिबानी प्रवृत्ती या आधी कधीही अनुभवली नव्हती, जी ठाकरे सरकारच्या काळात अनुभवायला मिळत आहे. एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्येचाच मार्ग स्विकारायला लागणार का? असा सवालही त्यांनी केला आहे. तर येत्या रक्षाबंधनाला राज्यातील महिलांनी एक राखी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवावी असे आवाहन चित्र वाघ यांनी केले आहे.