महात्मा गांधी ९ जानेवारी १९९५ रोजी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले. या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला. परदेशातील भारतीयांना देशाशी जोडण्याच्या उद्देशाने ९ ते ११ जानेवारी २००३ दरम्यान दिल्ली येथे पहिला ‘प्रवासी भारतीय दिवस’ आयोजित करण्यात आला होता.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली. २००३ पासूनच प्रवासी भारतीय दिवस सुरू करण्यात आला. एल.एम. सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने समिती स्थापन केली होती. भारतीय डायस्पोरावरील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ८ जानेवारी २००२ रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सिंघवी समितीचा अहवाल स्वीकारला. ९ जानेवारी २००२ रोजी प्रवासी भारतीय दिवसाची घोषणा करण्यात आली. यावर्षाचा हा १७ वा भारतीय प्रवासी दिवस इंदूरमध्ये साजरा होत आहे.
‘डायस्पोरा:अमृत काल में भारत की प्रगति के लिए विश्वसनिय भागीदार’ ही या वर्षाच्या दिवसाची संकल्पना संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिवशी १७ व्या भारतीय प्रवासी दिवसाचे उदघाटन झाले. १० जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
हा आहे उद्देश
अनिवासी भारतीयांना भारताबद्दलचे त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी आणि देशवासियांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जगातील सर्व देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे जाळे निर्माण करणे आणि तरुण पिढीला अनिवासी भारतीयांशी जोडणे, परदेशात राहणाऱ्या भारतीय मजुरांच्या अडचणी ऐकून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणे,अनिवासींना भारताकडे आकर्षित करणे आणि गुंतवणुकीच्या संधी वाढवणे, या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
हे ही वाचा:
जयंत पाटीलही आता टोमणे मारून घालवत आहेत वेळ!
घुसखोर चीनला ‘तिरंगी हेल्मेट्स’ ची चपराक
समाजवादी पार्टीचा प्रवक्ता पत्रकारांच्या कुटुंबियांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करत होता!
भूकंपाच्या धक्क्याने हिंगोली हादरले
असा होतो साजरा
साधारणत: या निमित्ताने ३ दिवसांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आपल्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या भारतीयांचा गौरव करण्यात येतो. तसेच, त्यांना प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
प्रवासी भारतीय सन्मान काय आहे
प्रवासी भारतीय सन्मान हा भारताच्या प्रवासी भारतीय व्यवहार मंत्रालयाद्वारे स्थापित केलेला एक पुरस्कार आहे आणि तो दरवर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त भारताच्या राष्ट्रपतींद्वारे प्रदान केला जातो. परदेशातील भारतीयांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.